आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड शहरात पालिकेकडून होणार दोन लाख वृक्षांचे रोपण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शहरातील बिंदुसरा नदीच्या दोन्ही बाजू, खासबाग उद्यान, खंडेश्वरी परिसरासह रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी विविध प्रकारच्या दोन लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रोपे लागवड करण्यासाठी पालिकेने कामास सुरुवात केली आहे.
पर्यावरणाच्या समतोलासाठी राज्यभर वृक्ष लागवड करण्याचा आदेश महसूल व वन विभागाने काढला आहे. यादृष्टीने बीडमध्ये पालिकेच्या हद्दीमध्ये दोन लाख वृक्ष लागवड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी दिले आहेत. यासाठी लागणारी यंत्रसामग्री, वृक्ष, मजूर व अन्य खर्च 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना कोचे यांनी पालिकेला दिल्या. पहिल्या टप्प्यात एक लाख वृक्षांचे रोपण पावसाळ्यापूर्वी केले जाणार आहे. यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, रोपावटिकेमधून घेतली जाणार आहेत. शहरामध्ये खासबाग उद्यान, भाजीमार्केट परिसर खासबाग, गणपती मंदिर गार्डन शिवाजीनगर, धर्मराज जोशी उद्यान, खंडेश्वरी रोड व परिसर, आयटीआय र्शीरामनगर, हनुमान मंदिर र्शीरामनगर, पाण्याची टाकी परिसर, पांगरी रोड, अंबिका नगर, नाळवंडी रोड, पाण्याची टाकी, धानोरा रोड पाण्याची टाकी, पत्रकार भवन, खासबाग पाण्याची टाकी, एमआयडीसी पाण्याची टाकी, बार्शीरोड एसटी वर्कशॉप, पंप हाऊस, पालिका परिसर, कंनकालेश्वर मंदिर, खंडेश्वरी मंदिर, शहेंशाहवली दर्गा रोड, स्टेडियम रोड, नगर रोड, इंदिरानगर डीपी रोड, नगर रोड पाण्याची टाकी व डीपी रोड, काडीवडगाव व ईट जलशुद्धीकरणगृह, शहरातील शाळा व महाविद्यालय, ट्रेचिंग ग्राउंड नाळवंडी रोड परिसर, बिंदुसरा नदीच्या दोन्ही बाजूने रोपांची लागवड करण्यासाठी पालिकेने जागा निश्चित केली आहे.