आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांच्या मृत्यूप्रकरणाला कलाटणी, जमिनीसाठी संपवले भावाचे कुटुंब; खुनाचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- ज्वारी खुरपण्यासाठी शेतात गेलेल्या दांपत्यासह त्याच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडला होता. दरम्यान, तिघांनी आत्महत्या केल्याचा  पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले होते. पोलिसही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचले नसताना या प्रकरणाला रविवारी कलाटणी मिळाली. मृत विवाहितेच्या नातेवाइकांनी जावयाच्या भावाविरोधात तक्रार दिली. यावरुन त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
सुशी येथील तुळशीराम लक्ष्मण पवार हे ३१ आॅक्टोबर रोजी पत्नी जयश्री व मुलगा सुरेशसह शेतात ज्वारी खुरपण्यासाठी गेले होते. दरम्यान, ते परत घरी न आल्याने नातलगांनी त्यांचा शोध घेतला असता १ नोव्हेंबर रोजी शेतातील विहिरीत जयश्री हिचा तर २ नाेव्हेंबर रोजी तुळशीराम व सुरेशचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या घातपाताचा संशय व्यक्त होत असताना विविध कंगोऱ्यांनी पोलिस तपास करत होते. मात्र, पोलिस कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नसतानाच रविवारी मृत जयश्री यांचा भाऊ अशोक नवनाथ ढगे (रा. खरवंडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांनी गेवराई पोलिसांत तुळशीराम याचा भाऊ राजेंद्र लक्ष्मण पवार याच्या विरोधात तक्रार दिली . शेतीच्या वाटणीच्या कारणावरून त्यानेच तिघांचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे राजेंद्र पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
रुग्णालयातून राजेंद्र पसार 
मृ़त तुळशीराम याच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी भाऊ राजेंद्र यानेही शेजाऱ्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. युवकांनी दरवाजा तोडून त्याला वाचवले व  जिल्हा रुग्णालयात उपचाराससाठी दाखल केले. रुग्णालयातून सुटी मिळताच तो रुग्णालयातून पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...