आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने गवताने भरलेला ट्रॅक्टर जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली : येथील टपाल कार्यालयासमोर आज दुपारी चारच्या सुमारास ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील गवताच्या गंजीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत ट्रॉली जळून खाक झाली. येथील टपाल कार्यालयासमोरून मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ट्रॅक्टर वाळलेल्या गवताने भरलेली ट्रॉली ओढत जात होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अनेक ट्रक उभे असल्याने आणि वाहनांची गर्दी असल्याने ट्रॅक्टरचालकाने विजेच्या खांबाजवळून वाहन हाकले. ट्रॉलीतील गवताच्या स्पर्शामुळे विजेच्या तारा एकमेकांना चिकटल्या आणि त्यातून निर्माण झालेली आगीची ठिणगी गवतावर पडली. क्षणात गवत आणि ट्रॉली जळून खाक झाली. या वेळी चालकाने ट्रॅक्टरचे हेड काढून घेतल्याने अधिकचे नुकसान टळले, तर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली आणि काही वेळाने रस्ता वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
बातम्या आणखी आहेत...