आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थातूरमातूर कारवाईमुळे दाेन वर्षांत अतिक्रमणे जैसे थे; परभणीत वाहतुकीचा खोळंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी धडक माेहिमेमुळे शहरातील अतिक्रमणे ध्वस्त झाली.  ही मोहीम शहराला नवा चेहरा देणारी ठरली होती. मात्र, पहिले पाढे ५५ या उक्तीप्रमाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे  व थातूरमातूर कारवाईने  पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यवर्ती भागासह नव्या वसाहती व राष्ट्रीय महामार्गावर वाढलेल्या अतिक्रमणांनी शहराला पुन्हा बकाल स्वरूप आणून दिले आहे.   

 
परभणी शहराचा गावठाण भाग अत्यंत कमी आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांत नव्या वसाहती व लोकसंख्याही वाढत गेली. वाढत्या लोकसंख्येमुळे क वर्ग पालिका असलेल्या या शहराला महापालिकेचा दर्जा तर मिळाला. मात्र, महापालिका प्रशासन विकास कामांच्या बाबतीत अत्यंत तोकडे पडल्याचे दिसून येते. त्यामुळे मूलभूत सोयी सुविधाही आजवर मिळू शकल्या नाहीत. मुळात अरुंद रस्ते, त्यात अतिक्रमणांची भर पडल्याने मध्यवर्ती भागात रोज वाहतुकीची पाहावयास मिळते. शहराभोवतीच्या  राज्य व राष्ट्रीय महामार्गावरही हीच स्थिती दिसून येते. 

  
एस.पी.सिंह यांची धडक मोहीम    

अडीच वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांच्या धडक मोहिमेने अनेक जागा  महापालिकेच्या असल्याची बाब प्रथम निदर्शनास आली.   सिंह यांनी महापालिकेच्या मालकीच्या जागांचा शोध लावून त्यावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणधारकांना हटवले.  यात शिवाजी उद्यान परिसरात बांधलेली घरांची पक्की अतिक्रमणे पाडली. अजून तरी या ठिकाणी  अतिक्रमणे झाली नाहीत   


ही ठिकाणे पुन्हा जैसे थे... : शहरातील डनलाॅप रोड, प्रशासकीय इमारतीकडे जाणारा रस्ता, ग्रंॅड काॅर्नरसह वसमत रस्ता व जिंतूर रस्त्यावरील अतिक्रमणे श्री सिंह यांच्या काळात जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र, मनपाच्या दुर्लक्षाने या जागांवर पुन्हा अतिक्रमणे विसावली आहेत. 

 

अतिक्रमणविरोधी पथक नावाला    
महापालिकेचेअतिक्रमण विरोधी पथक नावाला आहे. कधी तरी थातूरमातूर कारवाई केली जाते. नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांचे हितसंबंधही अतिक्रमणे वाढण्यास साहाय्यभूत असली तरी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने अतिक्रमणधारकांना पाठीशी घातले जाते. त्यातून पूर्वी काढलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे तर होत आहेत. नवी अतिक्रमणेही वाढत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...