आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : धारूरच्या घाटातील 100 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 धारूर- बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धारूर घाटात ट्रक कोसळला आहे. धारूरकडून तेलगावकडे हा मालवाहू ट्रक जात होता. समोरील ट्रकास साईड देताना ब्रेक न लागल्याने समोरील कठल्याला धडक लागून कठडा तुटल्याने शंभर फुट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धारूर घाटात घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे .
 
बीड येथील पुल खराब झाल्याने दोन दिवसापासून सोलापूर -औरंगाबाद रस्त्यावरील वाहणे गढी येथून धारूर -माजलगाव मार्गे सुरु करण्यात आली आहे . या मुळे धारूर घाटात जड वाहतूकीमुळे वाहनाची कोंडी होत आहे . गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास २०० पोते सिमेंटने भरलेला ट्रक एम .एच.१२ .ई. क्यू .९३६७ हा धारुर घाटातून माजलगावकडे जात होता . या वेळी समोरून येणाऱ्या वाहणास धोकादायक वळणाच्या ठिकाणी साईड देताना सरंक्षण कठड्याला धडक बसली . 
 
या दरम्यान; दगडी कठडा तुटून ट्रक १०० फुट दरीत कोसळला .ट्रक चालक मात्र उडी टाकल्याने किरकोळ जखमी होवून बचावला . गतवर्षी येथेच काही अंतरावर वळणाच्या ठिकाणी कठडा तुटून फडशी वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळला होता. 
बातम्या आणखी आहेत...