आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन ट्रकची धडक; हिंगोली-वाशीम रस्ता 2 तास ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील बळसोंड भागात वाशीम रस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हिंगोली-वाशीम रस्ता सुमारे दोन तास ठप्प झाला होता. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हिंगोली-वाशीम रस्त्यावर रविवारी सकाळी ११ वाजता वाशीमहून येणाऱ्या आणि येथून वाशीमकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकसेवा सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहनांना हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आले आणि नंतर दीडच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. बळसोंड भागात महानुभाव आश्रमाजवळ रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे अपघात झाले की नेहमीच वाहतूक व्यवस्था प्रभावित होत असते. सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणी फरशी वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने तब्बल तीन तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
बातम्या आणखी आहेत...