आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराईजवळ अपघात; ट्रकचालक जागीच ठार; तीन तास वाहतूक ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- गेवराईहून बीडकडे ऊस भरण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरवर माजलगावहून गेवराईकडे येणारा ट्रक समोरून आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. हा अपघात गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपासमोर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. मृत ट्रकचालकाचे नाव एकनाथ हरिभाऊ झेंडे (३१, रा. राजप्रिंप्री) असे आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला.

माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्यावरून ट्रकचालक एकनाथ हरिभाऊ झेंडे हा ट्रक (एमएच २१ ८७७३) घेऊन गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री येथे ऊस भरण्यासाठी निघाला होता. त्याच वेळी जालना जिल्ह्यातील समर्थ सहकारी साखर कारखाना येथून बीड तालुक्यातील सूर्याचीवाडी येथे ऊस भरण्यासाठी ट्रॅक्टर (एमएच २१ डी ४४३०) घेऊन चालक गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास निघाला होता. दोन्ही वाहने गेवराई शहरातील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपासमोर आली तेव्हा साइड घेताना वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात ट्रकचालक एकनाथ झेंडे यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...