आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकची कारला धडक; एक ठार, सात जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - पंढरपूर येथून आैरंगाबादजवळच्या रांजणगाव येथे जीपने परतताना समाेरून भरधाव ट्रकने जाेराची धडक दिल्याने एक जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात बागपिंपळगाव येथील जायकवाडी वसाहतीजवळ घडला. जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. सरस्वती भुंजग तांबे (७०) असे मृताचे नाव आहे.

पोिलस सूत्रांकडून मिळालेली मािहती अशी की, आैरंगाबादलगत असलेल्या रांजणगाव येथील नवनाथ शिंदे (६०), मंदा शिंदे (५५), किशोर शिंदे (४०), सरिता शिंदे (३५) व समृद्धी, शिवराज, गौरव ही लहान मुले व शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन येथील सरस्वती भुजंगराव तांबे हे सर्व झायलाे जीपने (एमएच २० बी सी ८२००) धाेंडे जेवणासाठी पंढरपूर येथे गेले हाेते. तेथून रांजणगावकडे परतताना बागपिंपळगाव परिसरात जायकवाडी वसाहतजवळ समोरून ट्रकने (एचआर १८ एम ८०४०) जोराची धडक दिली. त्यामुळे जीपचा चुराडा झाला तर ट्रक उलटला. या अपघातात सरस्वती भुंजग तांबे (७०) या जागीच ठार झाल्या, तर अन्य सात गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...