आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Truck And Car Accident In Parbhani Tow Women Dead

ट्रक-कार अपघात; दोन महिला जागीच ठार, चार जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- महालक्ष्मीचा सण आटोपून पुण्याकडे परत जाणाऱ्या कुटुंबाच्या इनोव्हा गाडीला ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या, तर चार जण गंभीर जखमी झाले. जिंतूर ते औंढा रस्त्यावर जिंतूर शहरापासून जवळच असलेल्या पुंगळा शिवारात शनिवारी (दि. २६) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. मीना सुभाष घुगे व अरुणा रघुनाथ नागरे अशी मृतांची नावे आहेत.

मूळच्या मेडशी (जि. वाशीम) येथील मीना सुभाष घुगे या पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्या महालक्ष्मी सणानिमित्त मेडशी येथे सासरी गेल्या होत्या. सणानंतर हिंगोली येथे माहेरी दोन दिवस राहिल्यानंतर त्या आपल्या मावसभावाच्या इनोव्हा (एमएच २० बीटी ६८१०) गाडीने शनिवारी पुण्याकडे जाण्यास निघाल्या होत्या. या वेळी त्यांचे औंढ्याजवळील नातेवाईक ऑपरेशनसाठी शिर्डी येथे जाणार असल्याने तेही येळी-केळी गावापासून या इनोव्हा
गाडीमध्ये बसले. दुपारी एकच्या सुमारास पुंगळा पाटीजवळ जिंतूरकडून येणारा ट्रक (एपी १६ टीवाय ७२५७) व त्यांची इनोव्हा कार यांची एका पुलावर समोरासमोर धडक झाली. यात मीना सुभाष घुगे व अरुणा रघुनाथ नागरे या दोघी जागीच ठार झाल्या. रघुनाथ नागरे, अनिता घोळवे, रितेश घोळवे व गाडीचा चालक राजकुमार जोंधळे हे अपघातात गंभीर जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना परभणी येथे हलवण्यात आले आहे. दोन वाहनांतील धडक ही इतकी भीषण होती की अपघातानंतर इनोव्हा गाडीतून मृतांना व जखमींना बाहेर काढणेही कठीण झाले होते.