नांदेड- लातूर-नांदेड रस्त्यावर आज (शुक्रवार) पहाटे भरधाव ट्रक आणि क्रूजरच्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
लातूर-नांदेड रस्त्यावरील चाकूरजवळ असलेल्या ब्रम्हवाडी पाटीजवळ ट्रक आणि क्रूजरची अगदी समोरासमोर जोरदार धडक झाली. यात क्रूजरचा चक्काचूर झाला. ही धडक एवढी भीषण होती, की क्रूजरमधील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. चार ते पाच प्रवासी जखमी असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या वाढू शकते.
ट्रक आणि क्रूजरची धडक झाली तेव्हा त्याचा आवाज दूरवर ऐकू आला. त्यानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना याची माहिती दिली.
पुढील स्लाईडवर बघा, अशी चक्काचूर झाली क्रूजर गाडी....