आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवेरा ट्रकवर धडकली, १९ वर्षीय युवती ठार, दोन जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- पुण्याहून औरंगाबादकडे जात असलेल्या तवेरा कारने रस्त्यावर पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. यात १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. ही घटना पुणे-औरंगाबाद महामार्गावरील कायगावजवळ दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास घडली. जखमींना औरंगाबादच्या घाटीत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटक येथील कुटुंबांनी शिर्डी येथे दर्शनासाठी आल्यानंतर शिर्डीतून तवेरा कार (एमएच.२०. सीएच.४७५२) ही किरायाने केली. ते त्या कारने शनिशिंगणापूरहून दर्शन घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ, खुलताबाद येथील दर्शनासाठी चालले होते, परंतु पुणे-औरंगाबाद महामार्गावरील कायगाव येथील गोकुळ ढाब्याजवळ सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक (एमएच.१२. एचडी.३०९९)ला धडकली. यात तवेरामधील १९ वर्षीय अकुश्री केंपे गौडा ही कारचा समोरील व मागचा दरवाजाचा मार लागून गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला, तर कारमधील नागराज गौडा, जयलक्ष्मी गौडा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.