आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुंद वळण रस्त्यामुळे ट्रक-कारची धडक; 4 ठार, पाच जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/भोकरदन - भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर इब्राहिमपूर फाट्याजवळ अरुंद रस्त्यामुळे अंदाज न आल्याने भरधाव ट्रक व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन चौघे ठार तर पाच जण जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या समोरील चाकामध्ये घुसलेली कार २०० फुटांपर्यंत फरपटत गेली. दरम्यान, पोलिसांनी ट्रकचालक विजय सुदर्शन गोस्वामी (४२, उल्हासनगर, मुंबई) यास ताब्यात घेतले आहे.

भागचंद कचरू वाघ (३५), संजय मैनाजी बनसोडे (३५), मैनाजी पिराजी बनसोडे (६५), श्रेयस संजय बनसोडे (६) अशी मृतांची नावे आहेत. तर रामचंद्र उमाजी मोरे, जयश्री रामचंद्र मोरे, अनिता संजय मोरे, यश संजय मोरे व ऋतुजा संजय मोरे (सर्व रा. फुलंब्री, जि.औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय प्रथमोपचार करून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हालवण्यात आले. बनसोडे कुटुंबीय नातेवाइकाच्या लग्नासाठी चांडोळ (जि. बुलढाणा) येथे गेले होते. दरम्यान, लग्न लावून परत गावी जात असताना त्यांच्या कार (एमएच १६ अार २०८८) ला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (एमएच ०५ एएम २३६५) ने जोराची धडक दिली. या वेळी कार ट्रकच्या समोरील दोन्ही चाकांमध्ये जाऊन अडकली. ट्रक भरधाव वेगात असल्यामुळे कार दूरपर्यंत फरपटत गेली. या वेळी कारमधील पुढच्या भागात बसलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...