आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक : श्रीमंत कोकाटे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - काही इतिहासकारांनी मराठ्यांना इतिहासात योग्य स्थान दिले नसल्याने त्यांची अभूतपूर्व कामगिरी अद्यापही समोर आली नाही. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन
इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी वसमत येथे मराठवाडा इतिहास परिषदेच्या 32 व्या राष्ष्ट्रीय अधिवेशनात केले.
हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयात शनिवारपासून अधिवेशनास सुरुवात झाली. ‘मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणाले, मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे गुरू कोण, याविषयी अद्यापही वाद सुरू आहे. काही इतिहासकार शिवाजीचे गुरू दादोजी कोंडदेव, संत रामदास असल्याचे सांगतात; परंतु याविषयी इतिहासात पुरावे नाहीत. त्यामुळे शिवाजीची आई जिजाऊ याच शिवरायांच्या खर्‍या गुरू आहेत. इतिहासातील मराठ्यांची कामगिरी अद्यापही पडद्यामागे राहिली आहे. इतिहासकाराने लेखन करताना विषयाच्या मुळाशी गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. आ. ह. साळुंखे म्हणाले, बहुसंख्य लेखक आज इंटरनेटवरील माहिती जमा करून इतिहासाचे लेखन करीत आहेत. त्यांना इतिहासकार म्हणता येणार नाही. जो इतिहासाच्या मूळ गाभ्यापर्यंत अभ्यास करतो. पुराव्यानिशी लेखन करतो त्यालाच इतिहासकार म्हणावे, अशी व्याख्या त्यांनी इतिहासकाराची केली.