आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी जेसीबी चोरला, नंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न; मोठा हात मारण्याचा प्रयत्न फसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - वसमत रस्त्यावर एका रांगेत उभ्या असलेल्या जेसीबीमधून एक जेसीबी बनावट चावीच्या आधारे चोरला. तेथून पाचच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्त्यावरील  एसबीआयचे एटीएम सेंटर जेसीबीच्या आधारे उखडून नेण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.  गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. 

वसमत रस्त्यावर खानापूर फाटा येथील पंडितराव मोहिते यांच्या ३-४ जेसीबी मशीन मुख्य रस्त्यावरच लावलेल्या असतात. यातील एक मशीन चोरट्याने बनावट चावीच्या आधारे गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास सुरू केले. 

जेसीबी घेऊन मुख्य रस्त्यावरच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमसमोर  दाखल झाला. त्याने वीज कंपनीची तारही  चोरली. ती तार जेसीबीच्या समोरच्या नांगराला बांधून दरवाजातून आतमध्ये जेसीबीच्या समोरील भाग टाकला. तारेच्या आधारे त्याने मशीन ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा  आतमध्येच उघडला जात असल्याने ते मशीन दरवाजाच्या बाहेर येऊ शकले नाही.   त्यामुळे जेसीबी रस्त्यावर सोडून चोरटा पसार झाला.  एटीएममध्ये १४ लाख रुपये होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.   दरम्यान या प्रकरणात कंत्राटदार पंडितराव मोहिते तसेच एसबीआयने नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...