आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रातील शिवस्मारकात साकारणार तुळजाभवानी मंदिर, कलादिग्दर्शक नितीन देसाईंची तुळजापुरात माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रवेशद्वार तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराची प्रतिकृती असणार आहे. शिवस्मारकाच्या केंद्रस्थानी कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर हुबेहूब साकारण्यात येणार असून मंदिरासभोवताली शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांचा पट साकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी रविवारी (दि.१) तुळजापूर येथे दिली. 
   
नितीन देसाई यांनी नववर्षदिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर कार्यालयात ते बोलत होते. या वेळी सिनेकलावंत दिलीप भोसले, ज्येष्ठ रंगकर्मी शिवाजी बोधले, माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंके, राजाभाऊ वाघ आदींची उपस्थिती होती. 

या वेळी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाची कल्पना विशद केली. ते म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रवेशद्वार तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराची प्रतिकृती  असेल.  छत्रपतींची कुलदेवता, स्फूर्तिस्थान आई तुळजाभवानी माता मंदिरासभोवती शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत महत्त्वाच्या प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली, हे भावी पिढीसमोर मांडून महाराजांचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचविण्याचे आव्हान आहे. ते पेलण्याची शक्ती देण्याच्या मागणीसाठी मी तुळजाभवानी चरणी नतमस्तक झाल्याचे नितीन देसाई यांनी सांगितले. मागील १२ वर्षांपासून देसाई नववर्षदिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत.

नववर्षदिनी तुळजाभवानी चरणी   
तत्पूर्वी देसाई यांनी तुळजाभवानी मातेचे पूजन करून दर्शन घेतले. तुळजाभवानीच्या दरबारात जागरण गोंधळ घातला. मागील १२ वर्षांपासून देसाई नववर्षदिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...