आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भवानी तलवार महापूजेनंतर शहर शक्तिदेवतेच्या जयघोषाने दुमदुमले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देताना शक्तिदेवता जगत््जननी तुळजाभवानीच्या भवानी तलावर अंलकार रूपाचे शनिवारी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष सुरू झाला. दरम्यान, सोमवारी दुपारी होमावरील धार्मिक विधीनंतर घटोत्थापन होणार आहे. त्यानंतर मंगळवारी पहाटे देवीचे सीमोल्लंघन होईल.

नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळीच्या दिवशी कुलस्वामिनी तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकारपूजा मांडण्यात आली. दिवसभर दोन लाख भाविकांनी दोन महाशक्तींचा संगम एक साक्षात तुळजाभवानी आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज याची देही याची डोळा पाहून धन्य झाले. सायंकाळच्या अभिषेकपूजेपर्यंत भवानी तलवार अलंकार पूजा भाविकांसाठी खुली होती.

भवानी तलवार अलंकारपूजा : कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते माता-पुत्राचे मानले जाते. स्वराज्य स्थापनेआधी महाराजांनी भवानीमातेचे आशीर्वाद घेतले होते, असे सांगण्यात येते. त्यांनी देवीला प्रेरणास्थान मानले होते. त्यामुळे त्यांना पुढे यश मिळत गेले, असे सांगितले जाते. त्यामुळे नवरात्रोत्सवात ही पूजा मांडली जाते.

सायंकाळच्या अभिषेकपूजेनंतर रात्री आई राजा उदो उदोच्या जयघोषात तुळजाभवानीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. तुळजाभवानीची चांदीची मूर्ती रथात ठेवून छबिन्याच्या वाहनावरून प्रदक्षिणा करण्यात आली. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजता होमकुंडात वैदिक होमास प्रारंभ होईल, तर रात्री १०.३५ वाजता पूर्णाहुती देण्यात येईल. त्याच वेळी ओवरीत छत्रपतींच्या वैदिक होमास प्रारंभ होईल. या वेळी शासकीय उपाध्ये बंडू पाठक, छत्रपतींचे उपाध्ये अनंतराव कोंडो यांच्यासह ब्रह्मवृंद, मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित राहतील.
बातम्या आणखी आहेत...