आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuljabhavani Navratraustav Starts From On 8 January

कुलस्वामिनी तुळजाभवानी नवरात्रोत्सव 8 जानेवारीपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- महाराष्‍ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास पौष शुद्ध अष्टमी म्हणजे बुधवार, 8 जानेवारी रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल, तर रात्री छबिना काढण्यात येणार आहे.
पौष शुद्ध 11, शनिवार, 11 जानेवारी रोजी देवीजींची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात येऊन रात्री छबिना काढण्यात येईल. रविवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता जलयात्रा, नंतर सुवासिनींची ओटी भरणे, दुपारी देवीजींची रथालंकार पूजा, रात्री छबिना असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 जानेवारीस रात्री देवीजींची शेषशायी अलंकार महापूजा व रात्री छबिना, 14 जानेवारी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा, रात्री छबिना, 15 जानेवारी रोजी देवीजींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, रात्री छबिना, 16 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा असून दुपारी 12 वाजता पूर्णाहुती, घटोत्थापन व रात्री छबिन्याच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप होईल.
67 सिंहासन महापूजेचा विक्रम
18 जानेवारीपासून देवीला दही, श्रीखंडाऐवजी केवळ दुधाची दररोज केवळ 7 सिंहासन पूजा करण्याचा मंदिर संस्थानने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आठ दिवसांपासून दररोज विक्रमी सिंहासन महापूजा होत आहेत. बुधवारी (दि. 1) अमावास्येदिनी देवीची मंचकीनिद्रा सुरू होत असून सिंहासनपूजा बंद होत आहेत. यामुळे भाविकांची सिंहासनासाठी मोठी गर्दी होत आहे. सोमवारी (दि. 30) सकाळी विक्रमी म्हणजे 67 सिंहासन महापूजा झाल्या. त्यापैकी श्रीखंडाच्या 64 व 3 दह्याच्या पूजा झाल्या. रविवारी सायंकाळी 24 सिंहासन पूजा झाल्या. यासाठी पहाटे 1 पासूनच भाविकांनी अभिषेक रांगेत गर्दी केली होती.
जिजाऊ जयंतीदिनी जलयात्रा
राष्‍ट्रमाता जिजाऊ जयंती 12 जानेवारी रोजी असून याच दिवशी शाकंभरी महोत्सवातील जलयात्रा हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला या वर्षी महिलांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आले आहे.