आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलस्वामिनीची शेषशायी अलंकाराने पूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या शेषनागावर स्वार शेषशायी रूपाचे शुक्रवारी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी पुणे येथील देवी भक्ताने तुळजाभवानीचे मंदिर विविधरंगी देशी-विदेशी फुलांनी सजविले होते. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी परिवहन महामंडळाने यावेळी चोख नियोजन केले आहे.

शुक्रवारी नवरात्रोत्सवाच्या ७ व्या माळेदिवशी सकाळची अभिषेक पूजा संपल्यानंतर कुलस्वामिनी तुळजाभवानीची शेषशायी अलंकार पूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी मातेला अभिषेक पूजेनंतर महावस्त्रे अलंकार घालण्यात येऊन देवीचे महंत तुकोजीबुवा व भोपे पुजारी यांनी अलंकार पूजा मांडली व त्यानंतर देवीचा अंगारा काढण्यात आला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत देवीचे शेषशायी रूप भाविकांसाठी खुले होते.
पूजेचे महत्त्व : भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावरती विश्राम करीत असताना तुळजाभवानीने विष्णूच्या नेत्रात जाऊन विश्राम घेतला. या वेळी भगवान विष्णूच्या दोन्ही कानामध्ून दोन दैत्य निर्माण झाले. शंभू व निशंभू हे दोन उत्पन्न होताच शेषशय्येवरील विष्णुवरती आक्रमण करू लागले.

तेव्हा भगवान विष्णूंच्या नाभीकमळात विराजलेल्या ब्रह्मा यांनी भवानीचा धावा करून जागृत केले. तेव्हा शंभू, निशंभू व भवानीचे युद्ध झाले. भवानीने या दोन्ही दैत्याचा वध केला. त्यामुळे भगवान विष्णूंनी आपली शय्या तुळजाभवानीला दिली. म्हणून अश्विन शुद्ध षष्टीस अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानीची शेषशायी अलंकार पूजा मांडण्यात येते.

भाविकांसाठी १७८५ जादा बस
भाविकांची संख्या वाढत असल्याने गैरसोय टाळण्यासाठी १७८५ जादा बसची सोय केली आहे. या अधिकच्या बसमुळे भाविकांची गैरसोय टळल्याचा दावा महामंडळाने केला आहे.

असे आहे नियोजन : तुळजापूरच्या जुन्या बसस्थानकातून सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद तर नवीन बसस्थानकातून औसा, लातूर मार्गावरील सर्व व बार्शी मार्गावरील व ग्रामीण भागात बस सुरू आहेत. तसेच हुमनाबाद, गुलबर्गाला नवीन बसस्थानकातून बस सोडण्यात येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...