आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मंदिरात भाविक थेट गाभाऱ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे आराध्यदैवत असणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या सुरक्षा व्यवस्थेला छेद देत भरदिवसा एका भाविकाने थेट गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तुळजाभवानीच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे उघड्यावर आणणाऱ्या या घटनेनंतर मंदिर संस्थानने काहीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
किरण सूर्यकांत मुळी (रा. परभणी) असे या भाविकाचे नाव आहे. तुळजाभवानी मंदिरात बुधवारी (दि.१२) दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी त्याने थेट देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. तुळजाभवानीच्या मूर्तीला हात लावून डोके टेकवून मनोभावे नमस्कार केला. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एका सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले. नावगाव ऐकून ताे पुजारी नसल्याचे समजताच सुरक्षा यंत्रणेची झोपच उडाली. या वेळी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

पुजाऱ्याच्या वेशात अंगावरचे कपडे काढून साेवळ्यात सराईतपणे त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला. खासगी कंपनीचे सुरक्षा कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने त्यांना याचे गांभीर्यच नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, किरण मुळी म्हणाला की, देवीदर्शनासाठी माझ्या आधी एक जण
गाभाऱ्यात गेला होता, असे सांगितले.