आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी संस्थानच्या उत्पन्नात वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद
महाराष्‍ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होत आहे. गतवर्षीच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड यावर्षी दहाव्या महिन्यातच ओलांडले आहे. 1 एप्रिल 2012 ते 31 जानेवारी 2013 पर्यंत तुळजाभवानी मंदिराला एकूण 30 कोटी 68 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन 2011-12 मध्ये 28 कोटी 71 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिली.
सोन्याच्या देणगीत वाढ
तुळजाभवानी मातेला श्रद्धेतून सोन्या-चांदीचे अलंकार भाविकांकडून अर्पण केले जातात. सन 2011-12 मध्ये एकूण 141 किलो 665 ग्रॅम चांदी आणि 12 किलो 621 ग्रॅम 110 मिलिग्रॅम सोने भाविकांनी अर्पण केलेले होते. यावर्षी यात वाढ झाली आहे. दहा महिन्यांतच म्हणजे 1 एप्रिल 2012 ते 31 जानेवारी 2013 या काळात 12 किलो 814 ग्रॅम 20 मिलिग्रॅम सोने आणि
334 किलो 999 ग्रॅम 980 मिलिग्रॅम चांदी भाविकांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केली आहे.
30 कोटींची भर
भाड्यापोटी 4 लाख 44 हजार
विविध ठेवी व बँकखात्यांच्या माध्यमातून 4 कोटी 93 लाख 88 हजार 667
देणगीद्वारे 5 कोटी 63 लाख 59 हजार 136
लिलावामधून 1 कोटी 90 लाख 46 हजार 970
सिंहासन पेटी 4 कोटी 47 हजार 9 हजार 586 रुपये उत्पन्न मिळाले आहे.