आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuljabhawani Temple Case : CID Powers Keep Limited

तुळजाभवानी मंदिर गैरव्यवहार: सरकारनेच सीआयडीचे पंख छाटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची चौकशी करून केवळ अहवाल सादर करण्यापुरते हक्क सीआयडीकडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अहवाल सादर करूनही पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने सीआयडीकडे तपास देताना कारवाईचे पंख छाटले नसते तर अनेक बड्या धेंडांना आतापर्यंत अटकही झाली असती.


संस्थानमधील गैरव्यवहाराबाबत जिल्हा प्रशासन, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु या तक्रारींची गांभीर्याने दखल न घेतल्याने पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी 21 एप्रिल 2010 रोजी पुन्हा धर्मादाय आयुक्त (लातूर) व शासनाकडे तक्रार अर्ज दिला. यामध्ये त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, विश्वस्त तथा मधुकरराव चव्हाण, तत्कालीन नगराध्यक्षा भारती गवळी, यांच्यासह इतरांविरोधात चौकशीची मागणी केली होती. आत्तापर्यंतच्या चौकशीतून गंभीर बाबी समोर आल्या असल्या तरी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारे विश्वस्त मंडळातील पदसिद्ध वरिष्ठ अधिकारी व तत्कालीन लोकप्रतिनिधी मात्र चौकशीपासून बाहेरच आहेत.


तपास अंतिम टप्प्याकडे सरकत असताना येणा-या काळात विश्वस्त म्हणून कामकाज पाहणा-या तत्कालीन विश्वस्तांची सीआयडीकडून चौकशी होणार आहे. या अनुषंगाने आवश्यक त्या प्रक्रियेची पूर्तता करण्यात येत असून, असे झाले तर वरिष्ठ अधिका-यांबरोबरच लोकप्रतिनिधी म्हणून विश्वस्त पद भूषवणा-या दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण व 20 वर्षांत नगराध्यक्षपद भूषवणा-या सर्वांचा चौकशीत समावेश असेल.