आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर पेटी लिलाव प्रकरणी काय कारवाई केली : हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील श्रीतुळजाभवानी देवस्थानच्या सिंहासन पेटीच्या लिलावात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी राज्याच्या गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागामार्फत करण्यात आली. अन्वेषण विभागाने लिलावात गैरव्यवहार झाल्याचा अंतिम अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी शुक्रवारी (२४ जून) केली.
बातम्या आणखी आहेत...