आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuljapur Navratri Festival News In Divya Marathi

धर्मसोहळा: ‘आई उदो उदो’चा जयघोष लाखावर भाविक नतमस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर -"आई राजा उदो उदो'च्या जयघोषात शनिवारी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीमातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता झाली. वैदिक मंत्रोच्चारात पूर्णाहुती देऊन घटोत्थापन करण्यात आले. रात्री छबिना मिरवणुकीनंतर महंत तुकोजीबुवांनी जोगवा मागितला. दरम्यान, शाकंभरी पौर्णिमेनिमित्त लाखभर भाविकांनी तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले.

सकाळी १० वाजता भवानी मंदिरातील गणेश ओवरीत यज्ञकुंडास प्रारंभ करण्यात आला. या वेळी शासकीय उपाध्ये बंडू पाठक यांच्यासह अनंतराव कोंडो, नीलोत्तम जेवळीकर, श्रीराम अपसिंगेकर, मकरंद प्रयाग, मुकुंद कमठाणकर, माणिक कांबळे, राजा आंबुलगे, दादा ढोले आदी ब्रह्मवृंदांनी सप्तशती पाठाची सांगता केली, तर १२ वाजता मुख्य यजमान प्रा.धनंजय लोंढे यांनी सपत्नीक पूजा करून होमाला पूर्णाहुती दिली. त्यानंतर घटोत्थापनाने शाकंभरी नवरात्राची सांगता करण्यात आली.

या वेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, कैलास पाटील, व्यवस्थापक तहसीलदार सुजित नरहिरे, दिलीप नाईकवाडी, राजामामा भोसले, गोविंद लोंढे, बाळासाहेब भोसले, अण्णासाहेब भोसले, जयसिंग पाटील, अंबादास औटी आदींची उपस्थिती होती.दरम्यान पहाटे १ वाजता चरणतीर्थ होऊन नित्योपचार पूजेनंतर देवीदर्शनास प्रारंभ करण्यात आला. देवीच्या अभिषेक पूजेस सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली.
सकाळी १० वाजता अभिषेक पूजा संपली. शाकंभरी पौर्णिमेनििमत्त दिवसभर भाविकांची गर्दी होती. दिवसभरात एक लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
अंबाबाईचा जोगवा
सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १०.३० वाजता मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर महंत तुकोजीबुवा यांनी मंदिरात जोगवा मागितला. धोतराचा पदर पसरून ‘अंबाबाईचा जोगवा’ म्हणत प्रदक्षिणा घातली. या वेळी भाविकांनी रोख स्वरूपात दक्षिणा देऊन जोगवा भरला.
घरोघरी घटस्थापना
तुळजापुरात शारदीय तसेच शाकंभरी या दोन्ही नवरात्रोत्सवामध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते. मातेच्या मंदिरातील घटोत्थापन झाल्यानंतर शाकंभरी नवरात्राची सांगता झाली.त्यानंतर गावातील घरोघरी घट उठवण्यात आले. तसेच उपवास सोडण्यात आले.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...