आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालक खूनप्रकरणी दरोडेखोरास अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - तुळजापूरजवळील ढाब्यावर दरोडा टाकून एका वाहनचालकाचा खून करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी शिताफीने अटक केली. बुधवारी पहाटे पटेल गुजराती ढाब्यावर हा दरोडा पडला होता. आरोपीविरुद्ध नांदेड येथे यापूर्वी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.
तुळजापूरपासून 5 किलोमीटरवर उस्मानाबाद रस्त्यावर असलेल्या गुजराती पटेल ढाब्यावर दरोडा टाकून मुक्कामासाठी थांबलेल्या वाहनचालकांना 7 ते 8 दरोडेखोरांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत आयशर टेम्पोचे चालक भाऊसाहेब शामराव पाटील (56, रा. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले होते. मारहाणीसाठी दरोडेखोरांनी तलवार, टॉमी, दगडांचा वापर केला होता. रोख रक्कम, एक मोबाइल हँडसेट, चांदीची अंगठी असा एकूण 8000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. तपासादरम्यान पथकाने कोंड, सुंभा (ता. उस्मानाबाद) शिवारात गुरुवारी दुपारी अट्टल दरोडेखोर जीवन ऊर्फ मंगेश पन्तू भोसले (23, रा. आस्वला, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) याला छापा मारून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.