आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार कोटींचा वीज निर्मिती संच सहा महिनेही चालला नाही; परळी केंद्रातील तीन संच बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- येथील नवीन वीज निर्मिती केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक उभारण्यास सहा वर्ष लागले. त्यावर दोन हजार कोटी रुपये खर्च झाला परंतु बॉयलरसह  अनेक कामे निकृष्ट  दर्जाची झाल्याने हा संच चाचणी होऊनही सहा महिनेही चालवत आला नाही. या संचाच्या उभारणीत दोष असून तो पुढे चालेल की नाही याची खात्री अधिकारी द्यायला तयार नाहीत.  आता केंद्रात  बंद असलेले २१० मेगावॉट क्षमतेचे तीन संच खाजगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा घाट असून तशी जाहिरातही  प्रकाशित  केली आहे.  
 

येथील नवीन वीज निर्मिती केंद्र परिसरात २५०  मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ८ उभारण्यास राज्य सरकारने ११ जुन २००९ मध्ये  मंजूरी  दिल्यांनतर  या संच उभारणीसाठी  १ हजार ३७५ कोटी रुपये संच उभारण्यासाठी अपेक्षित खर्च  होता. २० सप्टेंबर २००९ ला संचाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सदरील संच ३८ महिन्यांत  भेल कंपनीने उभा करणे बंधनकारक होते. परंतु या कंपनीने वेगवेगळी कंत्राटे इतर कंपन्यांना दिली. काम दिरंगाईने होत असल्याने या  कामाच्या किंमती वाढत गेल्या. तीन वर्षांत होणाऱ्या कामास तब्बल सहा वर्षे लागली. १३७५ कोटी  रुपयांत  होणाऱ्या कामावर २ हजार कोटी रुपये खर्च झाली. त्यामुळेच नोव्हेंबर २०१२  मध्ये होणारी चाचणी मार्च २०१७  मध्ये झाली. चाचणीनंतर हा संच चालवण्याचा प्रयत्न ऊर्जा विभागाने अनेक वेळा  केला. परंतु  बॉयलरसह  अनेक कामे निकृष्ट झाल्याने हा संच कायम चालू शकलेला नाही. आता संचाची चाचणी होऊनही सहा महिने लोटले तरी संच चालवता आलेले नाही. पाण्याअभावी बंद पडलेले २१०  मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक तीन, चार व पाच हे दोन वर्षांपासून बंद आहेत.  
 
सिमेंट उत्पादन घटले  
परळी वीज केंद्रात  २१०  मेगावॅट क्षमतेचे तीन  व २५०  मेगावॅट क्षमतेचे तीन असे सहा संच असून या संचाची  एकूण वीज निर्मितीची  क्षमता १३८०  मेगावॅट एवढी आहे. वीज निर्मिती केंद्रात दोनच संच चालू असल्याने सिमेंट कंपनीचे उत्पादन घटले असून मागणी एवढा राखेचा पुरवठाही होत नाही. 
 
राजकीय अनास्था  
राज्याच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणुन  काम करणाऱ्या पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दोघेही  परळीचे असुन दोघा पैकी  एकाने तरी या प्रश्नाकडे लक्ष दिले तर वीज केंद्रातील  सर्वच संच सुरू होऊ शकतात.परंतु राजकीय अनास्था दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...