लातूर- संशोधनाचा नागरिकांच्या कुतूहलांचा विषय ठरलेली एक दुर्मिळातील दुर्मिळ घटना शनिवारी येथील शासकीय रुग्णालयात सयामी जुळी मुलांच्या जन्माने जागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर येथील एका महिलेने सयामी जुळ्यांना जन्म दिला असून १५ लाख बाळंतपणात अशी एखादीच घटना घडू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
सास्तूर येथील तस्लिम अहेमद मासुलदार (२१) या गर्भवती होत्या. त्यांचे पती महाड (जि. रत्नागिरी) येथे मजुरी करतात. तस्लिम यांनी गर्भवती असताना वेळेत सोनोग्राफी केली नाही. त्या सास्तूरहून महाड येथे गेल्या १७ मार्च २०१६ ला तेथील देशमुख नर्सिंग होममध्ये सोनोग्राफी केली. त्यात त्यांना सयामी जुळे होणार असल्याचे निदान झाले. या वेळी गर्भ २२ आठवड्यांचा झाल्याने त्याचा वैद्यकीय गर्भपात करणे शक्य नव्हते. शनिवारी तस्लीम यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने सास्तूरच्या स्पर्श रुग्णालयात दाखल केले होते. तथापि, सोनाेग्राफी अहवालावरून तेथील डॉक्टरांनी त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. तेथे सहयोगी प्राध्यापक डॉ. भाऊराव यादव त्यांच्या १८ तज्ज्ञांच्या पथकाने गुंतागुंतीची सिझेरियन शस्त्रक्रिया करून मोहीम फत्ते केली. सयामी साडेआठ महिन्यांचे असून त्यांचे वजन ३.५ किलोग्रॅम आहे. छाती पोट चिकटलेले आहे. विशेष म्हणजे त्यांना एकच हदय यकृतही एकच असल्याने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ संबोधली जाणार आहे. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे उपाधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी डाॅक्टरांच्या टीमचे अभिनंदन केले.
असे पडले नाव सयामी
हेनाव एका चिनी दांपत्यास सयाममध्ये झालेल्या जुळ्यावरून रूढ झाले आहे. हे पुल्लिंगी जुळे १८११ ते ७४ पर्यंत जिवंत होते. बर्मन सर्कसमध्ये एक नवल म्हणून त्यांना दाखवण्यात येई. एन्ग चांग अशी त्यांची नावे होती. पुढे सयामी कथा, कादंबऱ्या चित्रपटांचाही विषय आल्याचे सूत्रांनी सांगितले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)