आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज तारेच्या धक्क्याने दोघा भावांचा मृत्यू, कंपनीकडे आठ दिवसांपूर्वीच दिली होती तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - घरावरून गेलेली वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीची तार वाºयामुळे तुटून पडल्यामुळे त्याला चिकटून दोघा भावांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे लातूर तालुक्यातील काटगाव येथे घडली. या प्रकाराला 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज कंपनी, महसूल अथवा पोलिस खात्याच्या एकाही अधिकारी-कर्मचाºयाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे सोपस्कारही पूर्ण केले नाहीत. मजुरी करून उपजीविका भागवणाºया कुटुंबातील दोघे कर्ते पुरुष गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
बालाजी उफाडे (22), भाऊ विलास (25) अशी मृतांची नावे आहेत. विलास उफाडे यांच्या घरावरून वीज कंपनीची मुख्य वाहिनी गेली आहे. रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसात ही तार तुटून उफाडे यांच्या दारासमोर पडली. सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास बालाजी लघुशंकेसाठी उठला. त्याने दाराबाहेर पाय टाकताच त्याचा पाय तारेवर पडला. विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे तो तारेला चिकटला. त्याचे ओरडणे ऐकून त्याचा भाऊ विलास जागा झाला. तो बालाजीला वाचवण्याच्या प्रयत्नात तोही चिकटला. यांना वाचवण्यासाठी आलेल्या चित्रकला उफाडे, गणेश उफाडे, रुक्मिणी शिंदे आणि लिंबाबाई देडे हे चौघे गंभीररीत्या भाजले. चौघांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले. याबाबत लातूरच्या गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो गातेगाव ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
अधिकाºयांना वेळ मिळेना... - दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिस आणि वीज कंपनीच्या एकाही अधिकाºयाने घटनास्थळी भेट दिली नाही. याबाबत वीज कंपनीच्या काटगाव कार्यालयातील दूरध्वनी दिवसभर कुणीही उचलला नाही. मुख्य अभियंता भोलाजी पाटील यांनी आपण मुंबईला असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता बी. आर. नरवडे यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.
तक्रारीकडे महावितरणचे दुर्लक्ष- घरावरील तारांमध्ये स्पार्किंग होत असल्यामुळे पोल शिफ्ट करावेत, असा अर्ज बालाजी उफाडे यांनी सहा महिन्यांपूर्वी काटगावच्या कार्यालयात केला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. आठ दिवसांपूर्वी याच लाइनच्या दुसºया खांबावरील तार तुटून पडली होती. त्यावेळीही उफाडे यांनी आपल्या घरावरील तार बदलण्याची मागणी केली होती. मात्र, वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी तुटलेली तार जोडली आणि उफाडेंच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. - राहुल शिंदे, ग्रामस्थ
उफाडे कुटुंब उघड्यावर - उफाडे यांच्या कुटुंबाला शेती नाही. दोघेही भाऊ मजुरी करून उपजीविका भागवायचे. त्यांना आणखी दोन भाऊ आहेत. त्यातील एक जण मनोरुग्ण आहे, तर चौथा रेणापूर तालुक्यात एका शेतावर सालगडी म्हणून काम करतो. दोघांचेही लग्न झाले असून बालाजीला दीड वर्षाची मुलगी आहे, तर विलासच्या पश्चात पत्नी, आणि तीन मुले आहेत. त्यामुळे वृद्ध आई, वडील आणि दोन महिला आणि चार चिमुरडी असे अख्खे कुटुंब उघड्यावर पडले आहे.