आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील यशासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींत समन्वय घडवून राज्यातील आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे दिली.
माजी मुख्यमंत्री चव्हाण कौटुंबिक सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी परभणीत दाखल झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दौरा खासगी असला तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिका-यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. राज्यातील आघाडी सरकारला पोषक वातावरण असून आघाडीची ही ताकद येत्या निवडणुकांत दिसून येण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींत समन्वय वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींनी एकत्र येऊन निवडणुकांसाठी आतापासून कामाला लागावे, त्यासाठी त्यांच्यात समन्वयाचे वातावरण चर्चेने निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून आघाडी सरकारला निवडणुकांत मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या दौ-यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांशी चर्चा केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.