आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड : व्यापार्‍यास लुटणारे सहा युवक अखेर अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तीन दिवसांपासून शहरात लुटमारीच्या घटनांनी उच्छाद मांडणार्‍या तसेच गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना बीडमध्ये लुटमारीने सलामी देणार्‍या दरोडेखोरांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पेठ बीड भागातील सहा युवकांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी दिली.

दोन फेब्रुवारीला रोजी व्यापारी प्रेमचंद संचेती दुकान बंद करून दुचाकीने घरी जात होते. विप्रनगर भागात तिघांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करताच त्यांच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेने गणेश प्रल्हाद भालशंकर (२५ रा. हनुमाननगर), बाबू विठ्ठल पवार (२६, रा. वतारवेस,)बलवानसिंग नेपालसिंग टाक (२४ रा. नागोबागल्ली), दीपक सुरेश माने (२३ रा. अयोध्यानगर), दीपक चंद्रकांत घोरपडे (२३, रा. जुनामोंढा), चंद्रकांत बाबूराव आनंतरवार (१८ रा. शिवणी ता. किनवट जि. नांदेड) यांना अटक केली. गर्दीच्या ठिकाणी लूट करणारे याच भागातील असावेत या संशयावरून या भागातील
संशयितांची चौकशी केली असता गणेश भालशंकरच्या टोळीचा पर्दाफाश झाला.

गणेश मुख्य आरोपी
या प्रकरणात गणेश भालशंकर मुख्य आरोपी असून इतर सर्व त्याचे साथीदार आहेत. गणेश याच्यावर दारू विकणे, मारामारी, चोरीप्रकरणी सहा गुन्हे नोंद आहेत.