परभणी - फायबर डोअर बनवण्यासाठी लागणा-या हार्डनर केमिकलच्या स्फोटात बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना कारेगाव रस्त्यावरील घरात शनिवारी घडली. उघडा महादेव मंदिराजवळील घरात शेख शकील व शेख जमील हे भाऊ डोअरचे काम करतात. शेख शकील सकाळी दहा वाजता काम करत होते.
तेव्हा केमिकलच्या डब्याचे झाकण काढताच जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एक कि.मी.पर्यंत गेला. यात शेख शकील (३५) हे तर सहा ते सात फूट उंच उडून लांब जाऊन पडले. त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्याच बाजूला असलेली शकील यांची आर्या ही अडीच वर्षाची मुलगीही ९० टक्के भाजली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.