आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराईत बॅंक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा; पती-पत्नीची हत्या, दोन मुली गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई येथील सरस्वती कॉलनीत बॅंक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा पडला. यात त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. - Divya Marathi
गेवराई येथील सरस्वती कॉलनीत बॅंक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा पडला. यात त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद/बीड(गेवराई)- गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी घाडगे पती-पत्नीची हत्या करुन दोन्ही मुलींनाही धारदार शस्ञाने बेदम मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गेवराई तालुका हादरला आहे. 
 
गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय 50) राहतात. बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा वाजवला असता घाडगे यांच्या पत्नी अलका ( 42) यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्ञांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदिनाथ घाडगे,  तसेच घरात असलेली बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (22) व स्वाती घाडगे (18 ) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला करण्यात आला. यात वर्षाची प्रकृती चिंताजनक आहे.
 
दोन्ही मुलींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत आदिनाथ घाडगे व अलका घाडगे या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे. सकाळी घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिस अधीक्षक. जी .श्रीधर यांनीही घटनास्थळी भेट दिली.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...