आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकी अपघातात बीडचे दाेन तरुण ठार, ट्रकचालक फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - बीड येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला ट्रकने समोरून धडक दिल्याने दाेघे जागीच ठार झाल्याची घटना २९ जून राेजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील रांजणी परिसरात धुळे - साेलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
सुनील अनंतराव पानभाते (२४) व राधेश्याम मुकुंद भोगे (२२) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. ते रविवारी रात्री दाेघे दुचाकीने (एम . एच. २३ वाय ७५९) औरंगाबादकडे जात हाेते. बीडपासून वीस किलाेमीटर अंतरावर रांजणी परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम. एच. २४ जे. ९७५५) धडक दिल्याने दुचाकीवरील दाेघे जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेतला अाहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.

थिगळे गल्लीत शाेककळा
अपघाताची माहिती कळताच बीडच्या थिगळे गल्ली भागात शाेककळा पसरली. धार्मिक विधी क्षेत्रात येथील भाेगे कुटुंब सर्वपरिचित अाहे. सर्वसामान्य कुटुंबातील सुनील पानभाते व राधेश्याम भाेगे यांच्या अपघाती मृत्यूमुळे लाेक हळहळ करत हाेते.
बस-टिप्पर अपघातात चार प्रवासी जखमी
लातूर - भरधाव टिप्परने बसला धडक दिल्याने बसमधील चार प्रवासी जखमी झाले, तर रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटारसायकल बसच्या चाकाखाली चेपली गेली. सोमवारी बाभळगाव नाक्यावरील रिंग रोडवर हा अपघात झाला. या प्रकरणी टिप्परचालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लातूरहून बस (एमएच २० डीएल ४८३) शिरोळ वलांडीकडे जात होती. ती बाभळगाव नाक्यानजीक आली असता मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने (एमएच ०९ बीसी ८८८८) बसच्या मागच्या बाजूस जोराची धडक दिली. यात चार प्रवासी जखमी झाले. बसला धडक बसल्याने चालक दगडू चेरे यांचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्यावरून खाली सरकली. यात मोटारसायकल (एमएच २४ एसी ८४६०) बसखाली चेपली गेली.
बातम्या आणखी आहेत...