आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीचा कडा कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- गोदावरी पात्रातील विहिरीत विजेची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांच्या अंगावर सिमेंटची कडा कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना  माजलगाव तालुक्यातील हिवरा(बुद्रुक)येथे बुधवारी सकाळी  नऊ वाजता घडली.
  
हिवरा येथील वचिष्ट देविदास चौरे (२५) व रामदास कालिदास चौरे (३०) हे दोन तरुण  शेतकरी वीज पंप सुरू होत नसल्याने गोदावरी पात्रातील विहिरीत उतरले होते. त्याच वेळी सिमेंटचा कडा दोघांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा  पाण्यात बुडून मृत्यू झाला.  या घटनेची माहिती हिवरा येथील संतोष संपत वनवे यांनी माजलगाव  ग्रामीण पोलिसांत  दिली. पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन  ग्रामस्थांच्या मदतीने  दोन्ही तरुणांचे मृतदेह  विहिरीबाहेर  काढले. 
बातम्या आणखी आहेत...