आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात दोन ठिकाणी शेतकर्‍यांच्या आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - पैठण तालुक्यातील वडजी येथील तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. सुरेश अंकुश भांड वय ३० वर्ष असे मृत शेतक र्‍याचे नाव आहे. या घटनेमुळे पाचोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेने हतबल झालेल्या सुरेशने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंजनडोहत विजेच्या तारेला स्पर्श
लाडसावंगी | कर्जबाजारीपणाला कंटाळून ५५ वर्षीय शेतकर्‍याने रोहित्रातून वाहणार्‍या विजेला स्पर्श करून आत्महत्या केल्याची घटना अंजनडोह येथे ९ सप्टेंबर रोजी केली. सूर्यभान अंबादास शेजूळ असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. लाडसावंगी परिसरात अंजनडाेह येथील शेतकरी सूर्यभान शेजूळ यांच्याकडे खासगी बँकेचेतीन लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच कर्ज फेडीचा तगादा व घरात दोन मुले बसून खातात. हतबल झालेल्या शेजूळ यांनी रोहित्रामधून वाहणार्‍या विजेला स्पर्श करून आत्महत्या केली.