बीड/ वडवणी - बीड तालुक्यातील बोरखेड येथील भरत निवृत्ती पवार वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील विश्वंभर बन्सी होंडे या दोन शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रदिनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पीक उगवल्याने भरत पवार हतबल झाले होते. सावकारांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी शुक्रवारी सकाळी सात वाजता कैलास गावडे यांच्या बोरखेड शिवारातील शेरी तलावाशेजारील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. विश्वंभर बन्सी होंडे (६२) यांनी कमी उत्पन्न झाल्याने शुक्रवारी सकाळी आठ वाजता शेतात गळफास घेतला. चिखलबीड हे गाव वडवणीपासून १२ किलोमीटर अंतरावर अाहे. होंडे १९९४ ते ९५ दरम्यान उपसरपंच होते. त्यांची चार एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
भरत पवार