नांदेड - येथे रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मारहाणीत काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी हैदराबादला हलवण्यात आले तर, नांदेड शहरांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. या भांडणाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
रस्त्याने वेगाने मोटर सायकल चालवण्यावरुन वाद झाला. यात चार ते पाच जण जखमी झाले तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले आहे.
सकाळी या मारहाणीचे वृत्त शहरात वार्यासारखे पसरले आणि बाजारपेठ बंद झाली. काही समाजकंटकांनी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीचा काळ असल्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त पोलस बल तैनात करुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे, दुकाने बंद आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिस उभे आहेत मात्र संचारबंदी नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
(संग्रहित छायाचित्र)