आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा- बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना भिवगाव परिसरात शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. बिबट्या बोर नदी परिसरात दिसल्याने शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वैजापूर तालुक्यातील भिवगाव भागात शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बोर नदी परिसरात ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला. या भागात बिबट्या असल्याची माहिती गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक ग्रामस्थांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यादरम्यान बिबट्याने झाडाझुडपातून निघत भिवगाव येथील रमेश वामन पवार (३५) व सचिन गायके (२५) या दोघांवर हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांनी उपचारासाठी हलवले. या भागात बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे वन विभागाचे वनपाल जे.पी. मिसाळ, व्ही.जी. जाधव, कर्मचारी डी.यू. गाडगीळ, एन.जेे. तारे, विठ्ठल पवार, जी.आर. तरटे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही या बिबट्याने दर्शन दिले. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे प्रधान राठोड, नारायण कातकुरे, आत्माराम पैठणकर आदींनीही घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी दिवसभर शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.
झुडपातच दडून बसला
बिबट्याला ग्रामस्थांनी आरडाओरड करत तसेच लाठ्याकाठ्या हातात घेऊन हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो भिवगावच्या दिशेने गेला. तो बोर नदीकाठच्या परिसरात असलेल्या झुडपात घुसल्याचे युवकांनी पाहिले. त्यामुळे २५ ते २० युवकांच्या टोळक्याने दूर उभे राहून त्याच्यावर पाळत ठेवली. मात्र, याच वेळी त्याने या युवकांमधील दोघांवर हल्ला करत त्यांना जखमी केले.
बातम्या आणखी आहेत...