आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, प्रकरणी पारोळा तालुक्यातील दोघांना जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील अनामत रकमेवरून खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी दोघांना जन्मठेपेची व ७० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी सुनावली आहे.
 
पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील रहिवासी रणछोड रामजी पवार यांच्याकडून उसतोड कामगारांना देण्यासाठी मोतीराम रोहिदास पवार व मोरसिंग उर्फ पिंटू सोन पवार यांनी २ लाख रुपये अनामत घेतली होती. मात्र ही रक्कम उसतोड कामगारांना न देता स्वतःसाठी वापरली ही बाब रणछोड यांना समजली तर तो परत मागेल या उद्देशाने त्यांनी रणछोड पवार यांचा मुलगा अरुण वय १४ याचे अपहरण केले.  मुलाने विरोध केला असता आरडाओरड केल्याने बिंग फुटेल या उद्देशाने गळा आवळून खून केला. त्यास जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तांड्याजवळील पदम तिमा पवार यांच्या शेतातील नाल्याच्या काठावर कपारीत पुरून ठेवले. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.यात डॉ अजित पाठक, नोडल ऑफिसर सचिन माधव शिंदे, तसेच तपासणी अधिकारी पारोळा पोलीस ठाण्याचे एपीआय मिलिंद इंगळे,  सुजित ठाकरे, आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यात सरकारी वकील एड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी काम पाहिले. या सर्वांची साक्ष ग्राह्य धरून आरोपींना जिल्हा व अति सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी कलम ३६३ प्रमाणे १० वर्ष, कलम १२० प्रमाणे १० वर्ष, कलम ३०२ प्रमाणे १० वर्ष व जन्मठेप, कलम २०१ प्रमाणे ३ वर्ष अशी शिक्षा सुनावली आहे. तर कलम ३६३ प्रमाणे १० हजार रुपये दंड , कलम ३०२ प्रमाणे १० हजार रुपये दंड, कलम २०१ प्रमाणे ५ हजार रुपये दंड असे प्रत्येक कलमाला प्रत्येकी ३५ हजार रुपये व असे फिर्यादीला दोन्ही मिळून ७० हजार रुपये द्यायचे आहेत. व ते न दिल्यास अतिरिक्त ६ महिने शिक्षा सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...