आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात दाेघांचा उष्माघातामुळे मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा/टेंभुर्णी - मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेने दोन बळी घेतले अाहेत. लोहार (जि. उस्मानाबाद) येथील मंगेश दत्ता लोहार (२३) या तरुणाचा सोमवारी सायंकाळी उष्माघाताने मृत्यू झाला.
 
व्यवसायाने सुतार असलेला मंगेश लोहार सोमवारी दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतल्यावर चक्कर येऊन खाली कोसळला. दुसऱ्या घटनेत लक्ष्मीबाई हरिभाऊ गवई (६५, अकोलादेव, ता. जाफराबाद) या त्यांच्या मुलीकडे पारेगाव येथे एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. गावाकडे परत येत असताना उष्माघात झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी परभणीत ४४, तर बीडमध्ये ४३.४ अंश सेल्सियस तापमान नाेंदवण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...