आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरी शहरातून रिक्षांची चोरी करणारे दोन चोरटे गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पाथरी शहरातून रिक्षांची चोरी करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघा जणांनी इतरही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.  

पाथरी तालुक्यातील बाबूलतार येथील शिवाजी उत्तमराव जोगदंड यांच्या मालकीचा अॅपेरिक्षा (एम.एच.२२-एच २४७३) ८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकारापाठोपाठ तीनच दिवसांनी पाथरी येथीलच सुरेश भगवान गोडबोले यांचाही अॅपेरिक्षा (एम.एच.२६, जी ३५३८) हा देखील २६ जानेवारी रोजीच रात्रीच्या सुमारास चोरून नेला असल्याची फिर्याद गोडबोले यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिल्यावरून पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.  

या दोन प्रकारांमुळे रिक्षा चोरीची टोळी सक्रिय असल्याची शक्यता लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्या अधिपत्याखाली पोलिसांचे विशेष पथक गठित करण्यात आले. या पथकास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पाथरीतीलच आश्विन रावसाहेब कांबळे व चाकण (पुणे) येथील दिलीप शिवराम गायकवाड यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता चोरीस गेलेले दोन्ही रिक्षा या दोघांनीच चोरले असल्याचे स्पष्ट झाले. तशी कबुली या दोघांनी दिल्यावरून त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही रिक्षाही त्यांच्याकडून जप्त केल्या.
बातम्या आणखी आहेत...