आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरात स्वाइन फ्लूचे दोन बळी; मृतांमध्ये गर्भवती महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - स्वाइन फ्लूने लातूरमध्ये दोघांचा बळी घेतला. पूजा स्वप्निल गुप्ता (२८, मजगेनगर, लातूर, औसा) व प्रा. मुलुकसाब अकबर अली (४४, औसा) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयात बुधवारपर्यंत पाच संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

पूजा गर्भवती होत्या. त्या १९ जानेवारी रोजी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर स्वाइन फ्लू प्रतिबंधित उपचार सुरू करून त्यांच्या थुंकीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. दोन दिवसांनी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेले १२ दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर ४ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

प्रा. अली यांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला होता; परंतु त्यांना डेंग्यू होता की स्वाइन फ्लू हे स्पष्ट होत नव्हते. बुधवारी त्यांच्या थुंकी तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे िनष्पन्न झाले. प्रा. अली हे मूळचे मुरूमचे होते. ते औसा येथील अजीम महाविद्यालयात प्राध्यापक होते.'

तिघांचे नमुने पाठवले
पाच संशयितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघे बुधवारी दाखल झाले. आधीच्या तिघांचे थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. - डॉ. दीपक कोकणे, अधीक्षक, रुग्णालय, लातूर