आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोडच्या दुचाकी चोरट्यांना जालन्यात पकडले; सात वाहने जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - गुन्हे शाखेच्या पथकाने सात दुचाकींसह तिघा चोरट्यांना जालना शहरात पकडले. चौकशीदरम्यान, त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली दिली. सर्व चोरटे पाचोड येथील रहिवासी आहेत.

ज्ञानेश्वर बाबासाहेब पालवे (19), रविंद्र रामसिंग शिकारे (26) व समाधान रामभाऊ गढवे (19 सर्व रा. पाचोड ता.पैठण, जि.औरंगाबाद) अशी चोरट्यांची नावे आहेत. 15 जानेवारी रोजी स्वर्ग हॉटेलसमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार आकाश रामचंद्र गोरे (मोतीबागेजवळ, जालना) यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक फरहत चॉद मिर्झा यांनी 25 जानेवारी रोजी चोरट्यांना अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आणखी दुचाकी चोरीची माहिती त्यांच्याकडून मिळू शकते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.