आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्‍ये ट्रक अपघातात दुचाकीस्वार ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात मंगळवार, दि. १३ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुरेश चव्हाण (वय ३५, रा. चोरमारेवाडी, ता. भोकरदन) याचा अपघातात मृत्यू झाला. बांधकाम कारागीर असलेले चव्हाण हे चोरमारेवाडी येथून सिल्लोडकडे मोटार सायकल (एमएच.२१.एझेड.१२५७) येत होते. त्यांच्या मोटारसायकल व ट्रक (एमएच.२१.ए .झेड.५४०१ )ला धडक बसल्यामुळे हेल्मेट तुटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथील असून अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...