आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच चर्चा, मराठा मोर्चा; नांदेडमध्ये दुचाकी रॅली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड  - मुंबईत ९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी बुधवारी नांदेड शहरात मराठा समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सुमारे पाच हजार मोटारसायकलींसह हजारो बांधव यात सहभागी झाले होते. रॅलीत महिला, मुलींचाही सहभाग होता.
 
वाहन रॅलीचा मार्ग
वामनराव पावडे मंगल कार्यालय ग्राऊंडवरून सकाळी या रॅलीस सुरुवात. 
-छत्रपती चौक {तरोडा नाका {राज कॉर्नर {आयटीआय {शिवाजीनगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन
- जुना मोंढामार्गे हडको येथे पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 
 
भाषणाने समारोप
विद्यार्थिनींनी भाषण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थिनींनी आपल्या भाषणात मुंबईतील ९ ऑगस्टच्या मोर्चात नांदेड शहरासह जिल्ह्यातील हजारो बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
 
बैठकीत रॅलीचे नियोजन  
विजयनगर मंगल कार्यालयात ३० जुलै रोजी समाजाची बैठक घेण्यात आली. त्यात रॅलीचे नियोजन केले होते. बैठकीस शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्या मुंबईतील मोर्चाच्या जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातही अशी रॅली काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या दिवशी ७ ऑगस्टपर्यंत अशा रॅली काढण्यात येणार अाहेत.
 
आयोजकांचा दावा
५,००० मोटारसायकली
१०,००० समाजबांधव
 
भगवे वातावरण
रॅलीच्या निमित्ताने समाजबांधवांनी भगवे झेंडे हातात घेतले होते. या भगव्या झेंड्यांमुळे शहरातील वातावरण भगवे झाले होते. भगव्या झेंड्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले झेंडेही रॅलीत डौलाने फडकत होते.
 
पुढील स्लाइडवर वाचा, रेल्वेने ७ व ८ रोजी मुंबईला जाणार... 
बातम्या आणखी आहेत...