आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक मराठा लाख मराठा’चा नारा देत... मराठा समाजाने काढली परभणीत ऐतिहासिक दुचाकी रॅली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"एक मराठा लाख मराठा’चा नारा देत सकल मराठा समाजाने शुक्रवारी (दि.चार) शहरातून मोटारसायकल फेरी काढून मुंबईच्या मोर्चाची जनजागृती करीत वातावरणनिर्मिती केली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या रॅलीने एक आदर्श घालून देत मोर्चाला येण्याचे आवाहन केले.  
 
परभणी  - येत्या ९ तारखेला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी  जिल्ह्यात मराठा समाज सरसावला आहे. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून आता गावोगावी बैठकांवर जोर दिला जात आहे. मोर्चाला जाण्या-येण्याची सोय, तेथील मार्ग, व्यवस्था, आचारसंहिता आदींची माहिती दिली जात आहे.
 
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकल मराठा समाजाने दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. त्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात दुचाकी रॅली परभणीकरांनी अनुभवली आहे. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दुचाकीस्वार गाड्यांना भगवे झेंडे लावून हजर झाले होते. शिस्तीत गाड्या एकामागोमाग लावण्यात आल्या होत्या.  मागील वर्षी भव्य मूकमोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यासह देशविदेशात मोठ्या संख्येने ५७ मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे मोर्चे काढण्यात आले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, जालन्यातील रॅलीत १० हजार समाजबांधव...
बातम्या आणखी आहेत...