आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंभईचा अट्टल वाहनचोर पकडला, १० दुचाकी जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - तालुक्यातील अट्टल वाहनचोर अनिल दांडगे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दहा दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.

सिल्लोड शहरालगत अजिंठा रस्त्यावर असलेल्या हॉटेल अमोल समोरून शहरातील स्नेहनगर भागातील रहिवासी शेख मुक्तार शेख सत्तार यांची दुचाकी (एम.एच. २१.झेड.६९६४ )बुधवार, दि.१६ रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी शे.मुक्तार यांच्या तक्रारीवरून शुक्रवार दि.१८ रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी लंपास करणारा अनिल दांडगे व त्याचे साथीदार चोरी करण्यात सराईत असून विकण्यातही पटाईत आहेत. चोरीच्या वाहनाचे इंजिन जुन्याला बसविण्यात येत असल्याने चोरी उघडकीस आणणे अत्यंत अवघड होते. परंतु सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी अत्यंत सखोल तपासाअंती या प्रकरणाचा छडा लावला आहे. चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला. अंभई तालुका सिल्लोड येथील अनिल दांडगे याने दुचाकी लंपास केल्याची माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने औरंगाबाद शहरातून नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
बातम्या आणखी आहेत...