आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरांच्या दोन टोळ्या गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दुचाकी चोरणाऱ्या दोन टोळ्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केल्या आहेत. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चाेरीचे प्रमाण वाढले होते. स्थानिक गुन्हे शाखा गुन्ह्यांचा तपास करत असताना परभणी जिल्ह्यातील टोळी असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. यावरून पथकाने परभणी जिल्ह्यातील अजहर मेहताब शेख (रा. गंगाखेड ) व जावेद महेबूब शेख (रा. परभणी) या दोघांना दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून यातील दोन दुचाकी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या असून एक परळी शहर ठाण्याच्या हद्दीतील आहे. इतर चार दुचाकींबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, तर बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगाव येथील मिलिंद अर्जुन सोनवणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आतापर्यंत चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

तपास सुरू
तिघांकडूनही सध्या मुद्देमालाची जप्ती सुरू असून अजून त्यांचे साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. दुचाकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. - दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, स्थागुशा
बातम्या आणखी आहेत...