आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडमध्‍ये दोन महिला अधिकारी निलंबित; शिक्षणाधिकारी सानप, तहसीलदार पवारांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीडमधील दोन वादग्रस्त महिला अधिका-यांना शुक्रवारी एकाच दिवशी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षण अधिकारी लता सानप आणि तहसीलदार ज्योती पवार यांच्यावर शासकीय कामात अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.

सानप यांना शिक्षण संचालकांनी निलंबित केले. सानप यांचे कार्यालयात न येणे, संचिका घरी नेणे, काही संस्थांच्या बेकायदेशीर संच मान्यता दिल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. शाळांना आमदार निधीतून मंजूर साहित्य वितरित करताना प्रशासकीय मान्यतेसाठी त्या अडवणूक करत असल्याची तक्रार आमदार अमरसिंह पंडित यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, कामकाजात निष्काळजीपणा केल्याने बीडच्या तहसीलदार ज्योती पवार यांनाही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबित केले. पवार जिल्हाधिका-यांच्या नोटिसीचे उत्तर देत नव्हत्या. त्यांच्याविषयी अनधिकृत गैरहजेरी, तहसीलमध्ये येणा-या लोकांशी चांगले न वागणे अशा तक्रारी वाढल्या होत्या.