आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड शहरात ट्रक-कारच्या धडकेत दोन तरुण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - भरधाव ट्रकची धडक बसल्याने कारमधील दोन युवकांचा बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला. बीड-गेवराई मार्गावरील हॉटेल साई पॅलेसजवळ घडली. अरविंद भारत मस्के व शिरीषकुमार अनिल लोंढे अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही बीडचे आहेत. औरंगाबाद येथे कामानिमित्त हे दोघे कारने (एमएच 14 सीके 3338) गेले होते. परतताना बीडहून गेवराईकडे जाणारा ट्रक (एमपी 09 केडी 8523) कारला धडकला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. दरम्यान, माजलगाव शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर बस दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील भाऊसाहेब काशिनाथ सोनवणे (सावरगाव) व भारती भवरसिंह (रा. राजस्थान) हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले
अपघातात कारचा चुराडा झाला. युवकांचे मृतदेह बाहेर काढणे जिकिरीचे बनले होते. कारला बाजूला काढण्यासाठी क्रेन मागवावे लागले. कारचा पत्रा कापून अडीच तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.