आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray And Pankaja Munde On Liquor Company Water

उद्धव म्‍हणाले, दारू कंपन्‍याचे पाणी बंद करा, पंकजा म्‍हणाल्‍या- हे अयोग्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे, फाइल फोटो. - Divya Marathi
पंकजा मुंडे, फाइल फोटो.
बीड - दुष्‍काळग्रस्‍त मराठवाडा पाणीटंचाईचे हाल भोगत असताना मद्यउद्योगांना दिल्‍या जाणा-या पाण्‍यावर प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. मराठवाड्यातील दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत बोलताना विरोध केला आहे. तर, अशा उद्योगांना दिलेले आरक्षित पाणी बंद करणे अयोग्य होईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्‍ये म्‍हटले आहे. काय म्‍हणाल्‍या पंकजा....
- पंकजा म्‍हणाल्‍या, “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारे पाणी हे आरक्षित केलेले असते. त्यामुळे अशा उद्योगांचे पाणी बंद करणे हे अयोग्य होईल.”
- “या उद्योगांना दिले जाणारे पाणी जर पिण्‍याचे असेल, तर ते बंद करावे.”
- “दारु कंपनी किंवा हे उद्योग बंद पडले तर उद्योजकांचे काही होणार नाही, पण कंपनीवर अनेक पोटं चालतात. त्‍यांच्‍यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हे पाणी बंद करणे चुकीचे ठरेल.”
काय म्‍हणाले उद्धव ठाकरे...
- मराठवाड्यातील दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. - 'मराठवाड्यात दारु कंपन्यांना दिले जाणारे पाणी तात्काळ बंद करा, असे ते म्‍हणाले.'
- औरंगाबादेत शिवसेनेतर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते.
- एकीकडे उद्धव यांनी दारु कंपन्यांना पाणी देण्‍यास विरोध केला. तर, मित्रपक्ष भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अशा उद्योगांचे पाणी बंद करणे अयोग्य असल्‍याचे म्‍हटले.
पुढे पाहा, संबंधित फोटो..